Pune Crime News : प्रेमाच्या जाळ्यात ओढून स्कूलबस चालकाचा शाळकरी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – पुण्यात एका स्कूलबस चालकानेच पंधरा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चालकांनी या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी संबंधित चालकाविरोधात गुन्हा (Pune Crime News) दाखल करण्यात आला आहे. सोमेश्वर घुले पाटील (वय 35, रा. वडाची वाडी, उंडरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पंधरा वर्षीय पीडित मुलीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

 

Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक  

 

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही कोंढवा परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेते. एका स्कूलबसमधून ती शाळेत ये जा करते. या स्कूलबसच्या चालकाची आणि पीडित मुलीची ओळख झाली होती. पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आरोपीने फिर्यादीला रिलेशनशिपमध्ये राहणार का असे विचारले. फिर्यादीला रिलेशनशिप म्हणजे काय हे माहीत नसतानाही तिने त्याला होकार दिला.

 

 

 

त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या दोन मैत्रिणीच्या घरी आणि पिसोळी परिसरातील अर्धवट बांधकाम झालेल्या एका इमारतीत पीडित तरुणीला घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.