Pimpri News : घरगुती अवैध नळजोड नियमित करण्यासाठी 1 हजार अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरातील पाण्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 1 हजार 19 जणांचे नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज आले आहेत. यामध्ये ब प्रभागातून सर्वाधिक 260, ह मधून 238 तर सर्वात (Pimpri News) कमी इ प्रभागात 56 अर्ज आले आहेत.

 

Pune Crime News : प्रेमाच्या जाळ्यात ओढून स्कूलबस चालकाचा शाळकरी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

 

शहरात 5 लाख 77 हजार मिळकतींची नोद आहे. मात्र, त्या तुलनेत अधिकृत नळजोड धारकांची संख्या कमी आहे. शहरात अवैध नळजोड धारकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. चुकीच्या पद्धतीने नळजोड केल्याने पाण्याची गळती होते. तसेच, दूषित पाणीपुरवठाही होतो. याचा परिणाम विस्कळीत पाणीपुरवठ्यावर होतो. त्यासाठी महापालिकेने वेळोवेळी अवैध नळजोडाचे सर्वेक्षण केले आहे. अवैध नळजोड नियमिती करण्यासाठी सवलती जाहीर केल्या. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाचे उत्पन्नही (Pimpri News) अतिशय कमी आहे. त्यामुळे महापालिकेने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात आली.

 

 

या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळावा, याकरिता घरगुती ग्राहकांकडून केवळ अनामत आणि दंडापोटी 5 हजार रुपये आकारण्यात येणार होते. या ग्राहकांना थकीत पाणीपट्टीसह प्रतिमहिना आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्कही माफ करण्याचे धोरण आखण्यात आले होते. ग्राहकांना 30 जूनपर्यंत या सवलत योजनेचा लाभ घेण्याची मुदत होती. या योजनेची (Pimpri News) आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मात्र, 1 हजार 19 नागरिकांनी अवैद्य नळजोड अधिकृत करण्यासाठी अर्ज केले आहेत. अवैध नळजोड अधिकृत करण्यासाठी नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज करण्यासाठी नागरिकांना एक महिन्याचा कालावधी मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.