Solar Eclipse : ऐन दिवाळीत पहायला मिळणार सूर्यग्रहण, पुण्यातही ग्रहण पाहण्याचा कालावधी एक तासाचा

एमपीसी न्यूज – दिवाळीच्या (Solar Eclipse) दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सुर्यग्रहण पहायला मिळणार आहे. हे ग्रहण दुपारी 4 वाजून 21 मिनिटांनी सुरु होणार असून ते 6 वाजून 17 मिनिटांपर्यंत दिसणार आहे. पुण्यातूनही हे ग्रहण दिसणार असनू ग्रहण हे दुपारी 4 वाजून 51 मिनिटांनी सुरु होणार असून ते सायंकाळी सहा या एक तासाच्या कालावधीत दिसणार आहे.

भारतात गुजरात, महाराष्ट्र व केरळ या राज्यात हे ग्रहण पाहता येणार आहे. या ग्रहणानंतर नऊ वर्षांनी म्हणजे 2031 साली सुर्यग्रहण होणार असल्याने हे ग्रहण खगोलशास्त्रज्ञासाठी खूप महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे कोणत्याही अंधश्रद्धा मनात न ठेवता हे ग्रहण सर्वांनी पहावे असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

हे ग्रहण सारोस 124 मालिकेतील हे ग्रहण असून त्यात दर 18 ते 19 वर्षाने येणाऱ्या एकूण 73 ग्रहणाचा समावेश आहे. या वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण असून त्यानंतर नऊ वर्षांनी भारतात केरळमधून 29 मे 2031 रोजी कंकणाकृती आणि काश्मीर येथून 20 मार्च 2034 रोजी खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यामुळे खगोलशास्त्र प्रेमींना हे ग्रहण एक पर्वणीच म्हणावे लागेल.

25 ऑक्टोबरच्या ग्रहणाची सुरुवात भारतीय वेळेनुसार दोन वाजून 25 मिनीटांनी आईसलँडमधून होईल, सर्वाधिक ग्रहण साडेचार वाजता रशियातील सैबेरिया येथून तर ग्रहण मोक्ष सहा वाजून 32 मिनीटांनी अरेबिअन समुद्रात होईल. हे सूर्यग्रहण उत्तर गोलार्धातून युरोप, उत्तर अमेरिका उत्तर आफ्रिका, मध्य आशिया येथून दिसेल. उत्तर गोलार्धात 80 टक्के सूर्य (Solar Eclipse) झाकाळला जाईल तर अक्षांसानुसार दक्षिणेकडे ग्रहण कमी दिसेल भारतातून ग्रहण गुजरात मध्ये 20 टक्के महाराष्ट्र 10 टक्के तर केरळात 3 टक्के ग्रहण दिसेल.

भारतातील पूर्वोत्तर राज्य वगळता देशातील सर्व राज्यातून कमी अधिक प्रमाणात हे ग्रहण दिसेल. महाराष्ट्रातील रेखांशानुसार पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागात जास्त वेळ आणि जास्त मोठे ग्रहण पहावयास मिळेल.

देशात सर्वात जास्त ग्रहणकाळ गुजरातमधून भूज येथे 1.43 तास तर राजकोट येथे 9.36 तास दिसेल. सर्वाधिक कमी काळ कोलकाता येथून तो केवळ 12 मिनिटे आणि कन्याकुमारी येथे 28 मिनिटेच ग्रहण दिसेल.

सर्वात मोठ्या आकाराचे ग्रहण ( चंद्र ग्रस्त भाग) 15 ते 20 टक्के गुजरात आणि राजस्थान राज्यात तर महाराष्ट्रात आठ ते दहा टक्के दक्षिण भारतात 3 ते 5 टक्के दिसेल. दर महिन्याच्या अमावास्येला सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो. परंतु, ते एका रेषेत येत नाहीत. त्यांच्या कक्षेच्या प्रतलांत 5 अंशाचा फरक असतो. त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही आणि ग्रहण होत नाही.

Nisarga Mitra : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे घरोघरी किल्ले बनवा स्पर्धा

ग्रहणात ज्या ठिकाणी चंद्राची गडद छाया पडते, (Solar Eclipse) तिथे चंद्राच्या कमी जास्त अंतरामुळे 1) खग्रास (Total) किंवा 2) कंकणाकृती (Annular) ग्रहण तर उर्वरित उपछाये च्या ठिकाणी 3) खंडग्रास ( partial) ग्रहण दिसते. 4) चौथ्या प्रकारचे सूर्यग्रहण हे मिश्र प्रकाराचे (Hybrid) असते.

यात काही भागात खग्रास तर काही भागात कंकणाकृती दिसते. हे ग्रहण दुर्मिळ असते. आताचे 25 ऑक्टोबरला होणारे ग्रहण हे खंडग्रास असून या वेळी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3 लाख 78 हजार 267 कीमी तर सूर्याचे अंतर 14 कोटी 84 लाख 80 हजार 130 कीमी असेल. यानंतर नऊ वर्षाने भारतात केरळमधून कंकणाकृती आणि काश्मीर येथून खग्रास सूर्यग्रहण दिसेल, त्यामुळे आताचे ग्रहण पाहणे ही पर्वणीच ठरणार आहे.

हे ग्रहण पहात असताना अतिनील किरणांच्या धोक्यामुळे सूर्यग्रहण हे कधीही उघड्या डोळ्याने, कॅमेराने.. द्विनेत्रीने किंवा दुर्बिणीने सरळ न पाहता उपकरणाच्या पुढे सुरक्षित फिल्टर लावूनच पहावे. दुर्बिणीच्या डोळ्याच्या जवळील आयपीसला फिल्टर लावू नये याची काळजी घ्यावी. यामुळे  तात्पुरती किंवा कायमची डोळ्याला इजा होण्याची शक्यता असते. ग्रहण पाहण्यासाठी सुरक्षित सुर्य चष्मे किंवा सुरक्षित काळ्या वेल्डिंग काचेतून पाहावे.

दुर्बिणीतून आणि घरच्या लहान आरश्यातून (Solar Eclipse) सूर्याची प्रतिमा भिंतीवर घेवून तसेच पिन होल कॅमेरा तयार करून ग्रहण पहावे. या वेळी पश्चिम दिशेला सूर्यास्तावेळी ग्रहण असल्याने निरीक्षण शिबीर घेताना किंवा धरून ग्रहण पाहताना क्षितिजावर सूर्यास्त पाहता येईल अशी जागा निवडावी. खगोल संस्थांनी विद्यार्थ्यांना खगोल विज्ञानाची माहिती द्यावी असे सुरेश चोपणे हयांनी म्हटले आहे.

चंद्र-सूर्य ग्रहणे या नियमित घडणाऱ्या खगोलीय घटना आहेत. केवळ हा सावल्यांचा खेळ असून याचा मानवी जीवनावर आणि शरीरावर काहीही वाईट परिणाम होत नाही. उलट या खगोलीय घटना विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांनी पाहाव्या त्याचा अभ्यास करावा आणि विश्वाचे नियम समजून घ्यावे, गरोदर स्त्रियांनी ग्रहण पाहू नये. ग्रहणात बाहेर निघू नये, जेवू खावू नये, ग्रहण वाईट असते अश्या अंधश्रद्धावर विश्वास न ठेवता ग्रहण पहावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.