Hinjawadi : मारहाणीत महिलेचा मृत्यू, तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मित्राच्या बहिणीने (Hinjawadi) शरीर संबंधाला नकार दिल्याने तिघांनी तिला बेदम मारहाण केली. तिच्या जखमांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याने महिनाभर सुरू असलेल्या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार 25 सप्टेंबरपूर्वी पाच ते सहा दिवस नेरे दत्तवाडी येथे घडला. 17 ऑक्टोबर रोजी महिलेचा मृत्यू झाला.
सनी उर्फ रामचंद्र राजू जाधव (वय 35), मंगल रामचंद्र जाधव (वय 28 ), सोनू दत्तू येवले (सर्व रा. नेरे दत्तवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सनी आणि मंगल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 36 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या 46 वर्षीय बहिणीचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी हे (Hinjawadi) फिर्यादी यांचे मित्र आहेत. आरोपींनी फिर्यादी यांच्या विवाहित बहिणीसोबत शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांच्या बहिणीने आरोपींना विरोध केला. त्यावरून आरोपींची तिला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान फिर्यादी यांच्या बहिणीच्या जखमांमध्ये जंगूसंसर्ग झाला आणि त्यात त्यांचा 17 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहे.
https://www.youtube.com/watch?v=tDllsJfDflw

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.