रविवार, सप्टेंबर 25, 2022

Khadakwasla Dam Update : खडकवासला धरणातून नदीपत्रात एकूण 18 हजार 491 क्यूसेक विसर्ग सुरु

एमपीसी न्यूज : गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असल्याने नदीपात्रातील पाण्यात आता वाढ होत आहे. खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam Update) सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून काल 15 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता 18 हजार 491 क्यूसेक करण्यात आले.

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, असे यो.स.भंडलकर (सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प) यांनी सांगितले.

कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नका आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

Veer Dam Update : वीर धरणातून नीरा नदीपत्रात एकूण 33 हजार 359 क्यूसेक विसर्ग सुरु

spot_img
Latest news
Related news