Talegaon Dabhade : इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे पुनर्वापरायोग्य कापडी नॅपकिनची जनजागृती

एमपीसी न्यूज : इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) तर्फे पुनर्वापरायोग्य कापडी नॅपकिनचे शालेय विधार्थिनींना वाटप करण्यात आले. पुनर्वापरायोग्य कापडी नॅपकिनचे इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्याकडून गाव भागातील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळा क्र 2 व 5 व स्टेशन भागातील संत ज्ञानेश्वर शाळा क्र 6 येथील आठवी, नववी, दहावीच्या प्रत्येक विद्यार्थिनीला प्रत्येकी 4 कापडी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. यामुळे हजारो सॅनिटरी नॅपकिनमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखू शकणार आहे.

हे कापडी नॅपकिन तीन वर्षे वापरता येत (Talegaon Dabhade) असल्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण रोखता येईल, असे आवाहन अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी प्रास्ताविकामध्ये केले. बदलाव फाउंडेशनच्या राधिका मॅडम यांनी या कापडी नॅपकिनच्या वापरा विषयी मार्गदर्शन केले. प्रोजेक्ट चेअरमन अर्चना देशमुख यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी तावरे मॅडम यांनी स्वागत केले. कांबळे मॅडम, थोरात मॅडम यांनी नियोजन केले, तर आभार प्रदर्शन पाटील सर यांनी मानले.

यावेळी अध्यक्षा वैशाली दाभाडे, अर्चना देशमुख, जयश्री दाभाडे, साधना भेगडे, ममता मराठे, अर्चना पिंपळखरे, मुग्धा जोर्वेकर, डॉ. राधिका, डॉ. वैष्णवी, माया भेगडे, वैशाली जामखेडकर, ज्योती जाधव, साधना काळोखे, वैशाली चव्हाण, स्नेहल निंबाळकर व क्लब सदस्या उपस्थित होत्या.

Khadakwasla Dam Update : खडकवासला धरणातून नदीपत्रात एकूण 18 हजार 491 क्यूसेक विसर्ग सुरु

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.