Pune Crime News : खंडणीच्या गुन्ह्यातील सात वर्षापासून फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – खंडणीच्या गुन्ह्यातील सात वर्षापासून फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. वेल्हा एसटी स्टँड येथून बुधवारी (दि.22) संबंधीत व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

राजू रामचंद्र दसवडकर (वय 48, रा. आकसवाडी, ता. वेल्हा, जि. पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू खंडणीच्या गुन्ह्यात मागील सात वर्षापासून फरार होता. राजू वेल्हा एसटी स्टँड येथे येणार असल्याची माहिती वेल्हा पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.याप्रकरणी वेल्हा पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.