Panshet News : पानशेत येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा

एमपीसी न्यूज – पानशेत परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी 48 तासांत आरोपीला अटक केली. खटला न्यायालयात गेल्यानंतर सोमवारी (दि.28) न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

घटनेतील आरोपीनं पीडित मुलीला पैसे आणि खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला पळवून नेलं होतं. यानंतर नराधमाने चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. संपूर्ण जिल्ह्याला हादरवणारी ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी 48 तासांत आरोपीला अटक केली. खटला न्यायालयात गेल्यानंतर सोमवारी (दि.28) न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

या घटनेचा पाठपुरावा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे ह्या करत होत्या. अनुषंगाने पत्र देऊन आरोपाला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त शिक्षा होण्याची सूचना केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.