Aditya Murder Case : 20 कोटींच्या खंडणीसाठी झाला आदित्यचा खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील (Aditya Murder Case) मासूळकर कॉलनीमधून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय आदित्य याचा 20 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अवघ्या 29 तासात गजाआड केले आहे.

मंथन किरण भोसले (वय 20 रा, मासुळकर कॉलनी), अनिकेत श्रीकृष्ण समदर (वय 21 घरकुल चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंथन भोसले हा आदित्य राहत होता त्याच सोसायटीमध्ये राहत होता. तो सतत सोसायटीमधल्या नागरिकांना व त्यांच्या मुलांना विनाकारण त्रास देत होता. यावरून आदित्यचे वडील गजानन ओगले यांनी त्याला बऱ्याच वेळा जाब विचारला होता.

त्यामुळे मंथन व ओगले कुटुंबात यामुळे वाद झाले होते व याची चर्चा सोसायटीत झाली होता. याचाच राग मनात धरून त्याने अगदी शिताफीने त्याचा साथीदार अनिकेत याच्या सोबत संगनमत करून गुरुवारी (दि.8) संध्याकाळी बिल्डींगखाली खेळायला आलेल्या आदित्यला अपहरणासाठी मंथन याने त्याच्या कारमध्ये ओढले. यावेळी आदित्य याने आरडाओरड सुरु केली. त्याचा आवाज बंद कऱण्यासाठी आरोपीने त्याचे तोंड व नाक दाबून त्याला जीवे ठार मारले.

Breaking news : पिंपरी येथील बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला

Aditya Murder Case

दरम्यान, गजानन यांनी आपला मुलगा सापडत (Aditya Murder Case) नसल्याने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनीही निर्जन जागांचा तातडीने शोध सुरु केला. यावेळी गजानन यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून 20 कोटी रुपयांची मागणी करणारा एसएमएस आला.

पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे माहिती काढली, तर तो फोन क्रमांक उत्तरप्रदेश येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार तपास सुरु असताना आरोपीने चिखली येथील एका बिगारी काम करणाऱ्या कामगाराच्या फोनचा वापर केल्याचे समोर आले. यावेळी पोलिसांच्या सायबर टिमने अथक प्रयत्नानंतर मंथन याच्यापर्यंतचा पुराव्याचा धागा शोधून काढला.

मंथन हा आदित्यच्या सोसायटीत राहत असून त्याबाबत सोसायटीधारकांनी अनेक तक्रारी असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मंथनला ताब्यात घेऊन त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने सत्यता सांगितली. त्याने सांगितले, कि आदित्यचा मृत्यू झाला असून त्याला पोत्यात भरून एमआयडीसी भोसरी परिसरातील एका पडीक बिल्डींगच्या टेरेसवर नेऊन टाकल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्यानुसार शुक्रवारी (दि.9) रात्री आदित्यचा मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, रागातून आदित्यचे अपहरण केले होते, तर खंडणी का मागितली व खंडणी मागूनही आदित्यला आरोपींनी जिवानिशी का मारले? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. याचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोन हे करत आहेत.

आदित्य याचे वडील गजानन ओगले हे बांधकाम व्यावसायिक असून तीन मुलीनंतर त्यांना आदित्य हा मुलगा झाला होता. त्यामुळे धकटा आदित्य घरात सर्वांचाच लाडका होता. मात्र, या अनपेक्षितपणे घडलेल्या दुःखद घटनेमुळे ओगले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या तपासाचा उलगडा सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक, युनिट दोन, गुंडा विरोधी पथक, अनैतिक मानवी प्रतिबंधक सेल व इतर गुन्हे शाखेचे अधिकारी, अमंलदार तसेच पिंपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी केले.

सर्वात महत्त्वाची कामगिरी सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक पानमंद, अंमलदार प्रशांत सईद व शाम बाबा यांनी केली. जेणेकरून गुन्हा एका दिवसात उघडकीस आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.