Wakad : वाकड येथे बंद घराचे कुलुप तोडून घरफोडी

एमपीसी न्यूज – वाकड येथे बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना 6 ते 8 सप्टेंबर या कलावधीत कस्पटेवस्ती (Wakad) येथे झाली आहे.

प्रवीणकुमार कृष्णा कांबळे (वय 38, रा. कस्पटेवस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

Aditya Murder Case : 20 कोटींच्या खंडणीसाठी झाला आदित्यचा खून; दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर मंगळवारी (दि. 6) दुपारी अडीच ते गुरुवारी (दि. 8) सायंकाळी साडेपाच वाजता च्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. घरातून 32 हजार 600 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.