Pune : पुण्यातील टिंबर मार्केट मधील जळीत ग्रस्ताना लवकरात लवकर मदतीसाठी प्रशासनाला निर्देश : अजित पवार

एमपीसी न्यूज : पुणे (Pune) शहरातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केट मधील लाकूड साहित्याच्या सात आठ गोडाऊन आणि चार घर जळून खाक झाली आहेत. त्या सर्वांना प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना दिले आहेत. अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

Alandi : आळंदी मधील श्री काळ भैरवनाथ मंदिरात गंगा दशहराचे आयोजन

यावेळी अजित पवार म्हणाले की, पुण्यातील (Pune) टिंबर मार्केट लाकूड साहित्य खरेदी करीता प्रसिद्ध आहे.या ठिकाणी सतत वर्दळ असते.त्या पार्श्वभूमीवर काही वर्षापुर्वी येथील मार्केट दुसर्‍या ठिकाणी करण्याच नियोजन होते.मात्र ते काही कारणास्तव होऊ शकले नाही. पण आता येथील लोकांनी कुठे जागा असल्यास त्याबाबत सांगावे. त्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील.

तसेच या आग लागलेल्या घटनेमध्ये कोणीही राजकारण आणू नये. येथील व्यापाऱ्यांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे. त्या दृष्टीने देखील पोलिसांनी तपास करावा आणि या सर्वांचा व्यवसाय, घर कशी उभा राहतील. यासाठी विशेष सर्व प्रयत्न झाले पाहिजे.अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

Pune : इनर व्हॉईस कडून नवशिक्यांसाठी पुण्यात “विपश्यना मेडिटेशन वर्कशॉप”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.