New Movie of Akshaykumar: अक्षय-आनंद रायच्या ‘रक्षाबंधन’ या नवीन चित्रपटाची घोषणा

Akshaykumar-Anand Rai's new movie 'Rakshabandhan' announced जीवनात अशी क्वचितच एखादी कहाणी असते जी आपल्या अंतःकरणाला इतक्या खोलवर आणि सहजपणे स्पर्श करते. ही कहाणी आपल्याला हसवेल आणि रडवेल.

एमपीसी न्यूज – बहीण भावाच्या प्रेमाचा महिमा वर्णन करणारा रक्षाबंधनाचा सण सोमवारीच आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. यंदा या सणावर कोरोनाचे सावट असल्याने नेहमीसारखा जल्लोषात तो साजरा करता आला नाही. पण तरीदेखील प्रत्येकाना आपापल्या परीने त्याचा आनंद घेतला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण भावाच्या नात्याचा गोडवा समोर येतो. दिग्दर्शक आनंद एल. राय लवकरच ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत. तेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट पुढील वर्षी 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

आनंद एल. राय आणि अक्षय कुमार या जोडीचा ‘अतरंगी रे’नंतर आता ‘रक्षाबंधन’ हा आणखी एक चित्रपट येणार आहे. राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

‘अतरंगी रे’सह या चित्रपटाची कथादेखील आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा या जोडीने लिहिली आहे. याची निर्मिती आनंद एल राय आणि अक्षय कुमारची बहीण अलका हिरानंदानी यांनी केली आहे.

आनंद म्हणाले, ‘रक्षाबंधन’ हा आमचा आणखी एक चित्रपट आहे. याची कथा खूप खास आहे. हा नात्यांचा उत्सव आहे.’ अक्षय कुमार म्हणाला, ‘जीवनात अशी क्वचितच एखादी कहाणी असते जी आपल्या अंतःकरणाला इतक्या खोलवर आणि सहजपणे स्पर्श करते. ही कहाणी आपल्याला हसवेल आणि रडवेल.

ज्यांना बहिणी आहेत ती व्यक्ती किती धन्य आहे, याचा अनुभव हा चित्रपट देईल. मला सर्वात जास्त आनंद याचा आहे की माझी बहीण अलका दिग्दर्शक आनंद एल राय यांच्यासह या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.’

या चित्रपटामध्ये अक्षयच्या चार बहिणी असल्याचे पोस्टरवरुन दिसते आहे. यात अक्षय आणि अलकाची रिअल लाइफ बॉन्डिंगदेखील दिसणार आहे. अक्षय कुमार आणि आनंद एल राय यांनी या लॉकडाऊनमध्ये हा चित्रपट फायनल केला. या दोघांमध्ये तीन चित्रपटांची डील झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.