Akurdi News : एसबीआय बँकेच्या एटीएम मधून बॅट-या चोरीला

एमपीसी न्यूज – गणेश व्हिजन, आकुर्डी येथे असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये चोरट्याने चोरी केली. एटीएम सेंटरमधून एटीएम साठी वापरल्या जाणाऱ्या बॅट-या चोरट्याने चोरून नेल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 14) सकाळी साडेसहा ते साडेसात वाजताच्या कालावधीत घडली.

योगेश मधुकर काटकर (वय 29, रा. निगडी. मूळ रा. सातारा) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश व्हिजन आकुर्डी येथे एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. मंगळवारी सकाळी साडेसहा ते सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरटा एटीएम सेंटरमध्ये आला. त्याने एटीएम मशीनच्या बॅकअपकरिता लागणाऱ्या अॅमरॉन कंपनीच्या 24 हजारांच्या दोन बॅट-या चोरून नेल्या. फिर्यादी हे सुरक्षा रक्षक असून त्यांनी याबाबत बुधवारी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.