Chinchwad News : इंस्टाग्रामवर फोटो टाकल्याने आई ओरडली; ​मुलगी ​ घरातून बेपत्ता

एमपीसी न्यूज – मुलीने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले. त्या कारणावरून तिची आई तिला ओरडली. आईवर रागावलेल्या मुलीने घर सोडले. मात्र मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय तिच्या आईला आहे.

याबाबत 49 वर्षीय आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीने तिचे फोटो इंस्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे फिर्यादी मुलीला रागावल्या. त्या कारणावरून मुलगी बुधवारी (दि. 15) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घरातून निघून गेली. ती रात्री उशिरापर्यंत घरी परत आली नाही.

फिर्यादी यांच्या मुलीला अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा फिर्यादी यांना संशय आहे. त्याबाबत त्यांनी अपहरणाची फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.