Pimpri news: शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प स्वच्छतेचा, सुंदर भोसरीचा! ; नगरसेवक अजित गव्हाणे यांचा स्वच्छतेसाठी पुढाकार

नगरसेवक अजित गव्हाणे यांचा स्वच्छतेसाठी पुढाकार

एमपीसी न्यूज:  देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या सहकार्याने संकल्प स्वच्छतेचा, सुंदर भोसरीचा उपक्रम हाती घेतला आहे. ओला व सुका कचरा विलगीकरण जनजागृती अभिमान आज (गुरुवार) पासून सुरू केले. प्रभाग क्रमांक 5 मध्ये पुढील काही आठवडे हे अभियान सुरू राहणार आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जाणार असून कचरा वेगळा करण्यासाठी संपूर्ण प्रभागात गव्हाणे यांनी स्वखर्चाने डस्टबीनचे वाटप केले आहे.

नगरसेवक अजित गव्हाणे विविध लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असतात. काही दिवसांपूर्वीच स्वखर्चाने प्रभागातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली. प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गव्हाणे नेहमीच विविध उपक्रम राबवितात. आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी स्वछता महत्वाची असून प्रभाग स्वच्छतेसाठी अजित गव्हाणे यांनी पुढाकार घेतला. नागरीकांना सोबत घेऊन ओला, सुका कचरा वेगळा करून देण्याचे महत्व पटवून दिले. कचरा वेगळा करण्यासाठी संपूर्ण प्रभागात स्वखर्चाने डस्टबीनचे वाटप केले आहे. प्रभागातील नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. या मोहीमेमध्ये जेष्ठ नागरीक संघ, महिला बचत गट, सार्वजनिक मंडळांनी उत्फुर्त सहभाग घेतला आहे.

स्वच्छ सुंदर शहर असेल तर आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत – गव्हाणे

नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, “सफाई कर्मचारी आपले काम करत असतात. त्यांना मदत व्हावी. स्वच्छतेची जनजागृती व्हावी. सर्व प्रभागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व लक्षात यावे यासाठी हा उपक्रम राबविला. प्रभागात स्वखर्चाने डस्टबीनचे वाटप केले. स्वच्छ सुंदर शहर असेल तर आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत. सर्वांनी स्वच्छ व सुंदर शहराचा संकल्प करावा. शहर स्वच्छ सुंदर निरोगी राहावे म्हणून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वच्छता कर्मचारी नेहमीच आपलं काम चोखपणे करत असतात. कोरोना काळात स्वच्छता कर्मचारी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता आपले काम काम करत होते. त्यामुळे आपण स्वतःहून ओला व सुका कचरा वेगवेगळा करून पर्यावरण नीट राखण्यात मदत करायला हवी. याच उद्देशाने लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ओला कचरा व सुका कचरा विलगीकरण जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.