Akurdi Saptah : श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन

एमपीसी न्यूज – काळभोरनगर येथील हनुमान मित्र मंडळ आणि गुप्ता-जैसवाल फाऊंडेशन (Akurdi Saptah) यांच्या वतीने 9 ते 16 नोव्हेंबर 2022  दरम्यान संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवडगावातील विसर्जन घाटावरून बुधवारी (दि. 9) सकाळी 11 वाजता पं. पू. प्रद्युम्न महाराज यांच्या उपस्थितीत कलश यात्रेला प्रारंभ होणार आहे.  

या धार्मिक कार्यक्रमात कथा वाचन पं. पू. श्री. प्रद्युम्नजी महाराज वृंदावन, वाराणसी (लंका) हे करणार आहेत. आकुर्डीतील खंडोबा मंदिर सभागृह येथे दररोज सायंकाळी 4.30 ते रात्री 8.15 वाजता कार्यक्रम होणार आहे. भागवत कथा वाचनाला बुधवार (दि. 9) रोजी प्रारंभ होणार असून मंगल कलश यात्रा व बेदी स्थापनाही होणार आहे.

No water supply : वारजे जलकेंद्र परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

गुरुवार (दि. 10) शुकदेव परिक्षित संवाद कर्दम चरित्र, शुक्रवार (दि. 11) जड भरत यांचे चरित्र, ध्रुव चरित्र, प्रघ्नाद चरित्र, शनिवार (दि. 12) वामन अवतार श्रीराम कृष्ण जन्मोत्सव, रविवार (दि. 13) बाल लीला, माखन चोरी लीला, चीर हरण व गोवर्धन लीला, सोमवार (दि. 14) द्वारिका लीला रुक्मिणी मंगल, मंगळवार (दि. 15) सुदामा चरित्र, परिक्षित मोक्ष शुकदेव पूजन, भागवत पूजन आणि बुधवार (दि. 16) रोजी पुर्णाहुति ब्राह्मण भोजन आणि महाप्रसाद वितरणाने या धार्मिक कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमात (Akurdi Saptah) सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक, कथा सप्ताह समितीचे त्रिभुवन तिवारी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.