Alandi : आळंदी प्रशासनाने बुजवले खड्डे; नागरिकांना दिलासा

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये खड्ड्याची पूजा झाल्यावर (Alandi) आता प्रशासन जागे झाले आहे. हवेली विभागातील पुणे आळंदी रस्त्यावर असलेले छोटे मोठे खड्डे प्रशासनाने बुजवले आहेत.

लहान-मोठ्या खड्ड्यामुळे नागरिकांना पावसातून तसेच प्रवास करताना त्रास सहन करावा लागत होता. तर, काही ठिकाणी अपघातही वाढले होते.

Alandi : संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ वारकरी आणि धारकऱ्यांमार्फत आळंदीत दुग्धाभिषेक

या खड्ड्यांची पाहणी शहर अभियंता गिरमे यांनी केली. आणि दि.7 ऑगस्ट रोजी ते खड्डे पालिका प्रशासनामार्फत बुजवण्यात आले. तेथील खड्डे बुजवण्याची माहिती आळंदी पालिका मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.