Alandi : भागवत एकादशीनिमित्त माऊलीं मंदिरात आकर्षक फुलसजावट

एमपीसी न्यूज – आज  (दि.26 )  भागवत एकादशी निमित्त आळंदी येथील (Alandi) संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी माऊली मंदिरात मोठी गर्दी केली होती.

एकादशी व गणेशोत्सव निमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात व महाद्वाराच्या येथे आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती. एकादशीच्या उपवसानिमित्त भाविकांना मंदिरात उपवासाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Pune : श्री गणाधीश रथातून दुपारी चार वाजता निघणार ‘दगडूशेठ’ गणपती होणार विसर्जन मिरवणूकीत सहभागी

मंदिर परिसरातील हार,फुले ,प्रसादाची दुकाने  एकादशी निमित्त नागरिकांच्या गर्दीने गजबजली होती. तसेच पवित्र इंद्रायणी नदी मध्ये स्नान ही भाविक यावेळी करताना दिसत होते.

दुपार पासून आळंदी शहरात संतधार पाऊस (Alandi) चालू होता. तर गावठाण परिसरात विद्युत खांबा वरील विद्युत वाहिनी दुरुस्तीचे कार्य विद्युत विभागामार्फत चालू होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.