Alandi : इंद्रायणी माता पालखी परिक्रमेचा बागवान वस्ती ते तुळापूर प्रवास नावेतून

एमपीसी न्यूज :इंद्रायणी काठच्या गाव वस्त्या (Alandi)मधून प्रदूषण मुक्त इंद्रायणीचे प्रबोधन करत ,दुतर्फा प्रवास करत काल दि.25 रोजी मरकळ येथे इंद्रायणी माता पालखी परिक्रमा पोहचली.

त्या अगोदर काल आळंदीयेथून (Alandi)सकाळी साडे दहा वाजता या पालखी परिक्रमेने मरकळ कडे प्रस्थान केले होते.रांगोळ्या पायघड्यांनी,फटाक्याच्या अतिषबाजीत तर कुठे पुष्प वृष्टीत या सोहळ्याचे भाविक स्वागत करत आहेत.

Pimpri : गृहनिर्माण संस्थांद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्यास दंडात्मक कारवाई करा – दीपक केसरकर

या सोहळ्यात इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्ती प्रबोधन कीर्तनाच्या माध्यमातून केले जात असून विविध धार्मिक ,सामाजिक स्वच्छता अभियान व (आजानवृक्ष)वृक्षारोपण इ.कार्यक्रम पार पडत आहेत. या सोहळ्याचे आळंदीतील ह भ प गजानन महाराज लाहुडकर यांनी आयोजन केले असून इंद्रायणी काठी असलेल्या विविध गाव वस्त्यांमध्ये सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे भाविक स्वागत करत आहेत.

आज सकाळी दि .26 रोजी (मरकळ) बागवान वस्ती येथून इंद्रायणी मातेच्या जयघोषात या सोहळ्याने नावेतून तुळापूर कडे प्रस्थान झाले .व तुळापूर येथे संगम तटावर इंद्रायणी मातेची आरती करण्यात आली.तद्नंतर या सोहळ्याचे वडगांव शिंदे /काकडे च्या दिशेने प्रस्थान झाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.