Alandi : वेदश्री तपोवन येथे 33 कुंडीय महाविष्णूयागाचे आयोजन

एमपीसी न्यूज : मोशी आळंदी रोडवरील (Alandi) व हवालदार वस्ती जवळील वेदश्री तपोवन येथे या अधिक मासात 33 कुंडीय महाविष्णूयागाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने तेथे पौराणिक पद्धतीचे मंडप काम चालू आहे.

33 कुंडीय महाविष्णूयागचे आयोजन 8 ऑगस्ट व 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. या दिवशी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे. प. पू.स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या सानिध्यात याचे आयोजन करण्यात आले आहे. वैदिक (छात्र) मुखारविंरादातून विष्णू सहस्त्रनाम 3300 पाठ होणार आहेत.

Punawale : पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपो रद्द करण्याची मागणी

याबाबत सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण यांनी (Alandi) माहिती दिली. आळंदी, देहू पंचक्रोशीतील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी व आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.