Punawale : पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपो रद्द करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पुनावळेतील (Punawale) प्रस्तावित कचरा डेपो रद्द करण्याची मागणी शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले आहे.

पुनावळे येथे वन विभागाने महापालिकेला हस्तांतरित केलेली 26 हेक्‍टर जमीन आहे. सन 2008 मध्ये ही जमीन कचरा डेपोसाठी आरक्षित केली आहे. मात्र, कचरा डेपोला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. गेल्या पंधरा वर्षात या भागात विविध शैक्षणिक संस्था, मोठ-मोठे गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत.

जवळच हिंजवडी माहितीनगरी असल्याने देशभरातून आलेले नागरिक पुनावळे परिसरात स्थायिक झाले आहेत. सध्या पुनावळे परिसराची लोकसंख्या एक लाखाच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे येथे कचरा डेपो झाल्यास येथील नागरिकांच्या (Punawale) आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होईल, अशी भीती स्थानिकांना वाटत आहे.

Chinchwad : बस प्रवासात प्रवाश्याचे 25 हजार चोरीला

पुनावळे जवळील रावेत बंधाऱ्यातून संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरास पाणीपुरवठा केला जातो. कचरा डेपो झाल्यास शहरातील सर्व नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होण्याची शक्‍यता देखील वर्तविली जात आहे. या सर्व बाबी विचारात घेवून पुनावळे येथे प्रस्तावित असलेला कचरा डेपो रद्द करावा, अशी मागणी भुजबळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.