Chinchwad : बस प्रवासात प्रवाश्याचे 25 हजार चोरीला

एमपीसी न्यूज : चिंचवड ते मोरवाडी (Chinchwad) या पीएमपीएमएल बस प्रवासात प्रवाश्याच्या खिशातील 25 हजार रुपये चोरीला गेले आहेत. हि घटना गुरुवारी (दि.3) मोरवाडी येथे घडली.

याप्रकरणी विनोद देविदास कासार (वय 46 रा.सारोळा, उस्मानाबाद) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चिंचवड स्टेशन ब स्टॉपवर वरून पीएमपीएमएल बसमध्ये बसले.

Chakan : कंपनीच्या आवारातून एक लाखाचे साहित्य चोरीला, एकाला अटक

यावेळी ते मोरवाडी पर्यंत गेले असता (Chinchwad) त्यांच्या खिशातील 25 हजार रुपये चोरीला गेल्याचे उघडकीस आले. यावेळी चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.