Chakan : कंपनीच्या आवारातून एक लाखाचे साहित्य चोरीला, एकाला अटक

एमपीसी न्यूज- कंपनीच्या (Chakan) आवारातून एक लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. यातील एका आरोपीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही चोरी 19 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत बिरदवाडी येथील एका कंपनीत घडली.

नितीन मारुती जाधव (वय 41 रा चाकण ) याला अटक केली असून त्याच्यासोबत असलेल्या तीन साथीदारांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दत्तात्रय बबन पठारे (वय 31 रा चाकण) यांनी शुक्रवारी(दि.4) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi : माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी (Chakan) कोणाच्याही संमतीशिवाय कंपनीच्या आवारातील 70 हजार रुपये किमतीच्या सेंट्रींगच्या 90 प्लेटा 35 हजार पाचशे रुपयांच्या 25 स्क्वेअर ट्यूब व एक हायड्रोलिक जॅक असा एकूण 1 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे . पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून चाकण पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.