Alandi News : आळंदीत कार्तिकी यात्रेनंतर शहर स्वच्छतेला प्रथम प्राधान्य

एमपीसी न्यूज : कार्तिकी यात्रे नंतर आळंदी शहरात ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले दिसून येत होते. त्यामुळे पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यां मार्फत तो कचरा ट्रॅक्टर (Alandi News) मध्ये उचलून टाकण्याचे कार्य करताना दिसून येत आहेत.कार्तिकी यात्रे नंतर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या,कागद,पत्रावळ्या, उष्टे शिळे अन्न इ.प्रकारचा कचरा ठिक ठिकाणी नेहमीच दिसून येत असतो. कार्तिकी यात्रेवेळी व कार्तिकी यात्रे नंतर स्वच्छता कामगारांना शहर स्वच्छ ठेवण्याचे मोठे आव्हान असते.

PCMC News : महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त सोमवारी प्रबोधन पर्व

यावेळी सिद्धिविनायक कार्यालय वडगांव रस्ता,पद्मावती रस्ता, मरकळ रस्ता तसेच सिद्धबेट रस्त्यावरील, आळंदी केळगाव  रस्त्यावर आलेला कचरा मोठ्या प्रमाणात उचलला गेल्याने (Alandi News) तेथील नागरिकांनी या स्वच्छते बाबत समाधान व्यक्त केले आहे.स्वच्छता कामगार आपले कार्य याकाळात निष्ठेने करताना दिसून येत आहेत.कार्तिकी यात्रेनंतर पालिकेने शहरातील स्वच्छतेच्या कार्याला प्रथम प्राधान्य दिले गेले असल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.