PCMC News : महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त सोमवारी प्रबोधन पर्व

एमपीसी न्यूज – क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणासाठी प्रेरणादायी कार्य केले.  त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी त्यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधुन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.(PCMC News) या प्रबोधनपर्वास जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी केले आहे.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने 28 नोव्हेंबर रोजी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 28  नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तदनंतर पिंपरी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील मैदानात या प्रबोधन पर्वाचे उदघाटन सकाळी 10.45 वाजता  संपन्न होणार आहे.

Pimpri News : पालिकेच्या जिजामाता रुग्णालयास डेंटल एक्स रे मशीन भेट देणार

सकाळी 11 वाजता शाहीर राजेंद्र कांबळे यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम होणार असून   दुपारी  1 वाजता सिद्धार्थ मोरे यांचा  “मी जोतीराव फुले बोलतोय” हा एकपात्री नाट्यप्रयोग  होईल. साधना मेश्राम यांचा “अभिवादन क्रांतीसूर्याला” हा संगीतमय कार्यक्रम दुपारी 2 वाजता होणार आहे. (PCMC News) तर सायंकाळी 5 वाजता ‘शैक्षणिक चळवळ आणि समाज व्यवस्था’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये युवा वक्ते सर्वजित बनसोडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रबल मेहरोत्रा, युवा वक्त्या कविता म्हात्रे, मुस्लिम विचारवंत पैगंबर शेख यांचा सहभाग असणार आहे. महाचर्चेचे सूत्रसंचालन विजय गायकवाड करणार आहेत. सायंकाळी 7 वाजता  “ जागर सत्यशोधकाचा ” अर्थात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारीत काव्य ,नाट्य आणि  संगीतमय कार्यक्रमाने प्रबोधन पर्वाच्या कार्यक्रमाची सांगता होईल. या प्रबोधनपर्वास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.