Alandi : दसऱ्यानिमित्त ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई

एमपीसी न्यूज – दसऱ्यानिमित्त आळंदी येथील ग्रामदैवत श्री खंडोबाच्या मंदिरावर (Alandi) आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त परंपरेप्रमाणे श्री खंडोबा मंदिराच्या येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी,नृसिंह स्वामी ,श्री राम, श्री भैरवनाथ महाराज तसेच तुळजाभवानी माता यांच्या पालखीचे आगमन होत असते.

Thergaon : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे थेरगावमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत

 

त्या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे श्री खंडोबा मंदिर परिसरात पालखी सुविधांसाठी भव्य मंडप उभारला आहे. आज रात्री दि.23 रोजी अग्निशमन विभागामार्फत अग्निशमनदलाच्या गाडीच्या सहाय्याने  मंदिर परिसर पाण्याने स्वच्छ करण्यात (Alandi)  येणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.