Alandi News : सिध्दबेटात उमटत आहेत पखवाजाचे सुमधूर बोल

एमपीसी न्यूज : संत निवृत्ती ,संत ज्ञानेश्वर, संत सोपान देव व संत मुक्ताई यांची कर्मभूमी,लिलाभूमी म्हणून ओळखली जाणारी तसेच ऋषी मुनींच्या तपश्चर्याने व पदस्पर्शाने पावन असणारी भूमी म्हणजेच सिध्दबेट होय. येथील संथ इंद्रायणी नदी मातेच्या तीरावर वसलेल्या (Alandi News) निसर्ग रम्य प्रशस्त जागेत, विविध वृक्षाच्या शीतल छायेत,निरव शांततेत,दगडी वॉकिंग ट्रॅकवर चटई अथवा चादर अंथरून त्यावर बसत,वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी पखवाजाचा सराव करताना दिसतात.

आळंदीत मोठ्या प्रमाणात खासगी वारकरी शिक्षण संस्था आहेत.तिथे विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदयाचे शिक्षण घेण्यासाठी त्या संस्थेची असलेली ठराविक वार्षिक शुल्क(जेवण, शिक्षण,राहण्याची सुविधेसाठी इ.साठी) घेतले जाते.तेथील काही विद्यार्थी वारकरी धार्मिक संप्रदायाचे पुस्तक घेत पाठांतर करताना,गायन करताना,पेटी वादन करताना व पखवाजाचा सराव करताना सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत येथे दिसून येतात.

सिध्दबेटात संत निवृत्ती, संत ज्ञानेश्वर, संत सोपान देव व संत मुक्ताई यांच्या लिलाभूमी व कर्मभूमीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येथे येत असतात.त्यातच त्यांना येथील सुमधूर पखवाज वादनाचे सुमधूर आवाज ऐकू येतात.आपसूक भाविकांची पावले त्या दिशेने वळू लागतात.मंत्र मुग्ध करणारे बोल ऐकत तिथेच ते रममाण होतात.

Pune Bye-Election : कसबा पोटनिवडणुकीसाठी हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सिध्दबेटा सद्यस्थितीत इंद्रायणी नदीच्या तीरा जवळील काटेरी छोटी झुटपे काढून टाकण्याचे काम चालू आहे. तिथे वृक्षारोपणासह येथे एका खासगी संस्थेच्या माध्यमातून (Alandi News)  माऊलींच्या चरित्रा संबंधित प्रासंगिक चित्रे,बाग इ.विकास कामे येथे होणार आहेत. त्यामुळे संथ वाहणाऱ्या इंद्रायणी तीरावर बसून,विविध वृक्षांच्या शीतल छायेत,विविध विकास कामांच्या या सानिध्यात अनेकांना वारकरी संप्रदायाचा अभ्यास करण्यासाठी येथे प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.