Alandi : आळंदीमध्ये श्री दत्त जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – आज दि.26 रोजी श्री दत्त जयंती निमीत्त श्री दत्त मंदिरांत  (Alandi) दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी पुष्प,पुष्पहार, पेढे ,खडीसाखर  भाविक अर्पण करत होते.

सकाळी श्रीं चा अभिषेक करण्यात आला.  तसेच  दुपारी श्रीं ना नैवेद्य दाखवण्यात आला. सायंकाळी मंदिरामध्ये कीर्तन संपन्न झाले व श्री दत्त जन्म सोहळा संपन्न होऊन उपस्थित भाविकांना प्रसाद वाटण्यात आला.

Pune : 24 तास, राजकारणाने पछाडलेल्या फडणवीसांना, ‘सांस्कृतीक गौरवपर’ का बोलता येईना- गोपाळ तिवारी

श्री दत्त जयंती निमित्त मंदिरामध्ये भांडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.मंदिर गाभाऱ्यात फुलसजावट व रंग बेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तसेच आळंदीत ठीक ठिकाणी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात (Alandi) आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.