Pune : अल्लाना आर्किटेक्चर कॉलेज’च्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यास चांगला प्रतिसाद

आर्किटेक्चर कॉलेजच्या द्विदशकपूर्ती निमित्त यशवंतांचा सत्कार

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना आर्किटेक्चर कॉलेज’ मधील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार होत्या. ‘अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ ला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात गुणवंत माजी विद्यार्थी ,माजी प्राचार्य इत्यादींचा सन्मान आबेदा इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला .

प्राचार्य लीना देबनाथ, माजी प्राचार्य डॉ रणजित घोगले, आर्किटेक्ट जोहर सियामवाला, रोमेरो सिल्व्हेरिया, आर्किटेक्ट प्रकाश देशमुख, माजी प्राचार्य डॉ रणजित घोगले उपस्थित होते. “माजी विद्यार्थ्यांनी नेटवर्किंग करून पुढील पिढीला मार्गदर्शन करावे, संस्थेच्या आणि समाजाच्या भल्यासाठी कार्यरत राहावे” असे प्रतिपादन आबेदा इनामदार यांनी यावेळी बोलताना केले. प्राची अय्यर यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.