अभियंत्याने व्यापक, सर्वसमावेशक व बहुशाखीय दृष्टीकोन अंगीकारायला हवा-डॉ. रघुनाथ माशेलकर

एमपीसी न्यूज-आजच्या युगात अभियांत्रिकी अनेक शाखांबरोबर जोडले गेले आहे. त्यामुळे अभियंत्यांनी व्यापक, सर्वसमावेशक आणि बहुशाखीय दृष्टीकोन अंगिकारायला हवा. आपल्या कामाचा जगाला, देशाला आणि समाजाला कसा फायदा होईल, तसेच कि

मान साधन सामुग्रीमध्ये कमाल उत्पादन कसे देता येईल यावर अभियंत्यांनी लक्ष केंद्रीत करावे ,असा कानमंत्र ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.

पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेस्टिंग आणि रोबोटिक्सऑटोमेशन लॅबचे उद्घाटन डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. प्रसंगी वैशाली माशेलकर, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, उपकार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, खजिनदार आनंद कुलकर्णी, कुलसचिव अमोल जोशी, संचालक प्रा. राजेंद्र कडुसकर,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे आदी उपस्थित होते.

मॉडरोब योजनेच्या मदतीने, तसेच संस्थेच्या वतीने बावीस लाख रुपयांच्या खर्चातून ही प्रयोगशाळा विकसित केली आहे. ईव्ही तंत्रज्ञानातील सध्याचा ट्रेंड पाहता, विद्यार्थीभिमुख शिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधांची पूर्तता करण्यासाठी ही लॅब उपयुक्त ठरेल. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आणि उद्योगाच्या गरजा यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेच्या (सीओईपी) सहकार्याने रोबोटिक्स आणि ऑटोमेशन प्रयोगशाळा विकसित केली आहे, हे आनंददायी चित्र आहे, असे डॉ. माशेलकर यांनी नमूद केले.

तत्पूर्वी, डॉ. रघुनाथ व वैशाली माशेलकर यांनी संस्थेच्या सदाशिव पेठेतील मुख्यालयाला भेट कुलगुरू कै. विष्णू गंगाधर ऊर्फ दादासाहेब केतकर यांच्या 72 व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. आश्रम वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. डॉ. माशेलकर यांनी त्यांच्या बालपणी प्रतिकुल परिस्थितीमध्ये कशाप्रकारे अभ्यास केला याची माहिती देताना आयुष्यातील पहिला गुरु म्हणून स्वतःच्या आईचा उल्लेख केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.