Maha DBT Portal : शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे (Maha DBT Portal) देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे 4 हजार 305 अर्ज प्रलंबित असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित असल्याने पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यास विलंब होत असल्याने महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तात्काळ निकाली काढण्याच्या सुचना समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी पोर्टल डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत सन 2021-22 साठी 39 हजार 826 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. अर्जाची छाननी करुन पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे यांच्या कार्यालयाकडून (Maha DBT Portal) करण्यात येत आहे.

MPC News Podcast 11 May 2022 : ऐका… आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट!

अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिल्याने अनुसूचित जातीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी महाविद्यालयांची असेल व संबंधित महाविद्यालयांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.