Vadgaon Maval : अॅड मीनाक्षी गणेश ढोरे यांची वडगाव शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज  : वडगाव राष्ट्रवादीत पुन्हा एकदा नवचैतन्य संचारले असून आज तालुका अध्यक्षांनी  कार्यसक्षम पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.  त्यात प्रामुख्याने अॅड मीनाक्षी ढोरे, सौरभ सावले आणि अॅड अक्षय रौंधळ व शांताराम कुडे यांचा समावेश आहे.

 अॅड मीनाक्षी गणेश ढोरे यांची वडगाव शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पदवीधर मतदार संघातील महत्वाची जबाबदारी पेलण्यासाठी सौरभ कान्हू सावले यांची अध्यक्षपदावर तर मावळ  तालुका पदवीधर संघाच्या उपाध्यक्षपदावर अॅड अक्षय शिवाजी रौंधळ  यांना तर वडगाव शहर राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी शांताराम कुडे यांना या पदासाठी नियुक्ती करण्यात आली.

वडगाव मावळ येथे झालेल्या तालुक्याच्या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते सदर पत्रे देण्यात आली. आमदार सुनिल शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष बबनराव भेगडे, कृषी व पशु संवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर,ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव,महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत आदींच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्रे  देण्यात आली.
याप्रसंगी वडगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे,नगरसेवक  राजेंद्र कुडे, विशाल वहिले, अतुल राऊत, आफताब सय्यद, अविनाश बधाले, नगरसेविका माया चव्हाण, पूनम जाधव, पूजा वहिले, सोमनाथ धोंगडे,संतोष देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.