Uttar Pradesh News : मेरठहून परतत असताना असदुद्दीन ओवैसी त्यांच्या गाडीवर हल्ला

एमपीसी न्यूज – ऑल इंडिया मजलिस – ए – इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी उत्तर प्रदेश येथील मेरठहून परतत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. गाडीवर 4 राऊंड फायरींग केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. 

एआयएमआयएम चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी मेरठहून दिल्लीला परतत असताना हा हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले. येत्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मेरठ येथील किथौर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यक्रम आटपून परतत असताना हल्ला झाल्याचा दावा ओवैसी यांनी केला.

हल्लाचे वृत्त ओवैसी यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिले . ट्वीटमध्ये ओवैसी म्हणतात, “काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये 4 राऊंड फायरींग करण्यात आली. 3-4 लोक होते त्यापैकी सगळ्याच जणांनी हातातील हत्यार तिथेच टाकून पळ काढला. माझी गाडी पंक्चर झाली त्यामुळे मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघून आलो. आम्ही सगळेच ठिक आहोत.अलहमदु’लिलाह”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.