Pimpri Corona Update: शहरात आज नवीन 1 हजार 84 रुग्णांची नोंद; 2 हजार 383 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1 हजार 84 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त  झालेल्या 2 हजार 383 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील चार रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 576 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 51 हजार 822 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 11 हजार 910 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 11 हजार 604 रुग्ण गृहविलगीकरणात असून 306 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 80 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 928 आहेत. आज दिवसभरात 530 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 32 लाख 88 हजार 473 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.