Assembly Election Result : मध्यप्रदेश, छत्तीसगड,राजस्थानमध्ये भाजपाचे निर्विवाद वर्चस्व; भाजप मुख्यालयात होणार विजयाचं सेलिब्रेशन
एमपीसी न्यूज – सकाळी 11.15 पर्यंत आलेल्या कलानुसार मध्यप्रदेश , राजस्थान , छत्तीसगडमध्ये भाजपने बहुमत मिळविले (Assembly Election Result) आहे. तीन राज्यात भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं असून भाजपच्या या दणदणीत विजयाचं सेलिब्रेशन भाजप मुख्यालयात होणार आहे. भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. तेलंगणा राज्यात काँग्रेस व बीआरएसमधील अटीतटीच्या लढतीत सध्या काँग्रेसने आघाडी घेतली आहे.
11 .15 वाजताचे निकाल
छत्तीसगड
जागा भाजपा काँग्रेस इतर
90 55 33 02
मध्यप्रदेश
जागा भाजपा काँग्रेस इतर
230 160 67 03
राजस्थान
जागा भाजपा काँग्रेस इतर
199 109 72 18
तेलंगणा
जागा काँग्रेस बीआरएस भाजपा एमआयएम
119 62 44 09 04
—————————————————————————————————————————————-
सकाळी 10 च्या निकालानुसार छत्तीसगडमध्ये भाजपा व काँग्रेसला समान 44 जागा मिळाल्या आहेत. राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये भाजपाने बहुमत प्राप्त केले आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेस व बीआरएसमध्ये अटीतटीची लढत सुरु (Assembly Election Result) आहे.
10 वाजताचे निकाल
छत्तीसगड
जागा भाजपा काँग्रेस इतर
90 44 44 02
मध्यप्रदेश
जागा भाजपा काँग्रेस
230 136 90
राजस्थान
जागा भाजपा काँग्रेस इतर
199 115 72 17
तेलंगणा
जागा काँग्रेस बीआरएस भाजपा एमआयएम
119 61 50 04 04
—————————————————————————————————————————————-
चार राज्यांच्या निवडणुक निकालांमध्ये क्षणाक्षणाला बदल होताना दिसून येत आहे. सकाळी 9.45 च्या निकालानुसार राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांत भाजपाने बहुमत प्राप्त केले असून छत्तीसगडमध्ये आता अटीतटीची लढत सुरु आहे.
9.30 वाजताचे निकाल
छत्तीसगड
जागा भाजपा काँग्रेस इतर
90 44 42 02
मध्यप्रदेश
जागा भाजपा काँग्रेस
230 136 90
राजस्थान
जागा भाजपा काँग्रेस इतर
199 115 72 17
तेलंगणा
जागा काँग्रेस बीआरएस भाजपा एमआयएम
119 61 50 04 04
—————————————————————————————————————————————-
9.15 वाजताचे निकाल –पाच (Assembly Election Result ) राज्यांपैकी राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगक्णाष आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज रविवारी 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून 8 वाजता मतमोजणीला सुरुवात देखील झाली मध्यप्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरसीची लढत चालू आहे. राजस्थानमध्ये भाजपा आघाडीवर असून तेलंगणामध्ये काँग्रेसने बहुमत प्राप्त केले आहे.