Pimpri : पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर सरचिटणीस पदी जयंत शिंदे यांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर सरचिटणीस पदी जयंत शिंदे ( Pimpri) यांची निवड झाली. पिंपरी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर आझमभाई पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे आदी उपस्थित होते.

Maharashtra : ‘मुख्यमंत्री- माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा 5 डिसेंबरपासून प्रारंभ

जयंत शिंदे हे पेशाने ब्रँड कन्सल्टंट आहेत. तसेच त्यांचे कॉर्पोरेट, कल्चरल आणि पोलिटिकल ब्रँडिंगच्या क्षेत्रात मोठे नाव आहे. ‘ब्रँड सायन्स’चे जाणकार असलेल्या जयंत शिंदे यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितच फायदा होईल. त्यांच्या निवडीचे ( Pimpri) सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.