Pune : विसर्जन मिरवणूकीत लक्ष्मी रस्त्यावर सरासरी 101 डेसिबल ध्वनिपातळी, पुणेकरांकडून मीमद्वारे डिजे मंडळाचा खरपूस समाचार

एमपीसी न्यूज – मानाच्या गणपतीच्या ढोल-ताशा पथकानंतर डिजेच्या भिंती रस्त्यावर उतरू लागल्या अन कानाचे पडदे फाटतील एवढा आवाज सुरु झाला. सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या (Pune) उपयोजित विज्ञान आणि मानव्यविज्ञान विभागातर्फे विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणाची मोजणी करण्यात आली. त्यानुसार सरासरी लक्ष्मी रस्त्यावर सरासरी 101 डेसिबल ध्वनिपातळी नोंदविण्यात आली आहे.

Alandi : एमआयटी महाविद्यालयातील बीबीए आणि बीबीए-आयबी विभागाच्या रिइफ आणि रॉ क्लबने महाविद्यालय स्तरावरील व्यवस्थापन स्पर्धांचे केले आयोजन

यंदा लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत सरासरी 101.3 डेसिबल ध्वनिपातळीची नोंद झाली. त्यातही रात्री आठ वाजता खंडूजीबाबा चौकात तब्बल 129 डेसिबल ध्वनि पातळी नोंदवली गेली.

केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या निकषांनुसार दिवसा निवासी क्षेत्रात 55 डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात 75 डेसिबल, रात्री निवासी क्षेत्रात 45 डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात 70 डेसिबल ध्वनिपातळी असणे अपेक्षित आहे. विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहात या मर्यादा गणेश मंडळे, ढोलताशा पथके, ध्वनिवर्धक यांकडून सरळ धुडकावल्या गेल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होते. गेल्यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावर सरासरी 101 डेसिबल ध्वनि पातळी नोंदवली गेली होती. त्या तुलनेत यंदा किचिंत घट झाली. मात्र नोंदवली गेलेली ध्वनि पातळी आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते.

पुण्यात लक्ष्मी रस्त्यावरील 10 चौकांमधील आवाजाची सरासरी डेसिबल मध्ये बेलबाग चौकात 100.9, गणपती चौकात 106.3, लिंबराज- 106, कुंटे चौक- 107.4 , उंबऱ्या- 103.1 , गोखले- 99.8 , शेडगे विठोबा- 96.5, होळकर- 99.9, टिळक- 100, खंडोजीबाबा- 90.2, सरासरी- 101.3 डेसिबल.

मीमद्वारे पुणेकरांचा अनोखा निषेध
पुणेकरांनी सोशल मीडियावर मीम द्वारे डीजेच्या तालावर नाचणाऱ्या तरुणाईचा व संबंधीत मंडळावर टिका केली आहे. एका मीममध्ये तर गणराय चक्क कान नाक घसा तज्ज्ञाकडे उपचारासाठी गेल्याचे चित्र पहायला मिळाले. काही जणांनी 50 वर्षापुर्वीचा गणेशोत्सव आत्ताचा गणेशोत्सव याची तुलना करणाऱ्या पोस्ट त्यांच्या फेसबूक वॉलवर टाकल्या आहेत ज्यामध्ये रात्री बारा वाजता देखील मिरवणूका बघणे किती सुखकर होते हे आवर्जून सांगितले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.