International Yoga Day 2022 : आझम कॅम्पसमध्ये 21 जून रोजी साजरा करणार ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ 

दोन हजार विद्यार्थी - विद्यार्थिनी योग प्रात्यक्षिके सादर करणार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे मंगळवारी (दि. 21 जून) सकाळी 7 पासून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ (International Yoga Day 2022) साजरा करण्यात येणार आहे. एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.

Shree Potoba Devasthan : श्री पोटोबा देवस्थानच्या तपपूर्ती अहवालाचे प्रकाशन

यावेळी दोन हजारहून अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनी तसेच शिक्षक वर्ग फंक्शन ग्राऊंड (आझम कॅम्पस) येथे योग प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. त्यामुळे योगदिनानिमित्त (International Yoga Day 2022) पार पडणाऱ्या या कार्यक्रमाची उत्सुकता सगळ्यांमध्ये दिसून येत असून त्याचा सराव सुरू असल्याचे ‘आझम स्पोर्ट्स अकादमी’चे संचालक गुलझार शेख यांनी सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.