Shree Potoba Devasthan : श्री पोटोबा देवस्थानच्या तपपूर्ती अहवालाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळचे ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थानचे (Shree Potoba Devasthan) तपपूर्ती (बाराव्या) अहवालाचे प्रकाशन मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदाय आणि विश्वस्त मंडळाच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे यांनी देवस्थानच्या कार्याला मदत करण्याचे आश्वासन देत देवस्थानच्या प्रकाशित केलेल्या पारदर्शक अहवालाचे कौतुक केले.

यावेळी विश्वस्त उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, ह भ प सुखदेव महाराज ठाकर, ह.भ.प.मंगल जगताप, ह.भ.प तुषार दळवी, ह.भ.प दत्तात्रय शिंदे, ह.भ.प दत्तात्रय टेमघिरे,ह भ प गणेश जांभळे, भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, भंडारा डोंगरचे जगन्नाथ नाटक पाटील, जेष्ठ नेते सोपानराव ढोरे नगराध्यक्ष मयूर ढोरे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, अरविंद पिंगळे,शांताराम बोडके, संतोष कुंभार, पंढरीनाथ  ढोरे,नगरसेवक प्रविण चव्हाण, अर्चना म्हाळसकर,किरण म्हाळसकर सुनिता भिलारे, संभाजी म्हाळसकर, ॲड विजय जाधव,पत्रकार सुदेश गिरमे, गणेश विनोदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Chakan Fire News : चाकण मधील कंपनीच्या ऑइल साठ्याला आग

या कार्यक्रमासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवस्थानच्या (Shree Potoba Devasthan)  कार्याला सर्वोतपरी मदत करू आश्वासन दिले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी  देवस्थानच्या पारदर्शक अहवालाचे कौतुक केले श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त, सोपानराव म्हाळसकर यांनी देवस्थानच्या कार्याचा आढावा देत असताना चालू असलेले नियोजित श्री मंदिर व देवस्थान चे जागे संदर्भातील सर्व विषय वर्षाखेरीस मार्गी लागेल असे आश्वासन दिले.

तुम्ही हायड्रोजनवर गाडी चालवणार यावर माझाच विश्वास नाही, लोकांचा विश्वास कसा बसणार? गडकरींनी शेअर केला पत्नीचा तो मजेशीर प्रश्न

या कार्यक्रमाचे विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ॲड अशोक ढमाले, ॲड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे आदींनी संयोजन केले. शंकर पगडे, शांताराम म्हाळसकर, सचिन म्हाळसकर, संतोष म्हाळसकर यांनी आलेल्या वारकऱ्यांची अन्नदानाची व्यवस्था केली होती.

कार्यक्रमाचे स्वागत विश्वस्त सुभाषराव  जाधव, प्रास्ताविक विश्वस्त सचिव अनंता कुडे, सूत्रसंचालन कल्पेश भोंडवे व आभार नारायण ढोरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.