Chakan Fire News : चाकण मधील कंपनीच्या ऑइल साठ्याला आग

एमपीसी न्यूज –  चाकण येथील ‘मेटलॉजिक हीट ट्रीटमेंट सोलुशन्स’ या कंपनीच्या ऑइल साठ्याला काल (दि.18 जून) रात्री 10.57 वा मोठी आग (Chakan Fire) लागली. या आगीत सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही.

घटनेबद्दल सांगताना चाकण एमआयडीसी अग्निशमन केंद्राचे ड्राइव्हर ऑपरेटर सुनील शिरसाठ म्हणाले, तेथील वॉचमन, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने या आगी बाबत (Chakan Fire) आम्हाला कळवले, त्यामुळे चाकण केंद्राचा एक अग्निशमन बंब वेळेत घटनास्थळी पोहोचला.

NCP OBC Cell : आडनावावरून ओबीसींचा डाटा गोळा करण्यास राष्ट्रवादी ओबीसी सेलचा विरोध

ही कंपनी मरसिडिस बेन्झ कंपनी समोर आहे. कंपनीच्या मोठ्या पत्राशेडमधून आगीच्या धुराचे लोट येत होते. धुराचे लोट बाहेर दूरवर पसरले होते त्यामुळे बघ्यांची गर्दी सुद्धा जमली होती. कंपनीमध्ये एका 8 फूट x10 फूट च्या कंटेनर मधील ऑइल साठ्याला आग लागली होती, त्याची खोली कोणती हे कळले नाही मात्र त्यातील आगीच्या ज्वाला सुमारे 15 फूट उंचीवर असलेल्या छतापर्यंत जात होत्या.

Sanjay Raut : प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवरच देशाचं राजकारण उभा, अब तक 56 और भी आगे जाएंगे : संजय राऊत

घटनेबाबत कळताच चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस सुद्धा घटनास्थळी तात्काळ पोहोचले. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात यावी म्हणून सुमारे 45 मिनिटमध्ये फोमचा वापर करून केला आणि आग आटोक्यात आणून ती विझवली. आग लागली त्यावेळी कंपनीत कोणीच कर्मचारी नव्हते त्यामुळे सुदैवाने या आगीमुळे कोणतीही जीवितहानी किंवा कुणाला दुखापत झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.