Maval News : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी बाळासाहेब काळोखे 

एमपीसी न्यूज : श्रीक्षेत्र देहू येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, देहू-आळंदी परिसर विकास समितीचे सदस्य  बाळासाहेब सोपान काळोखे यांची मावळ विधानसभा मतदार संघाकरिता राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. 

मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष  प्रदिपदादा गारटकर,. मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे यांच्या उपस्थितीत वडगाव मावळ येथे  बाळासाहेब काळोखे यांना सरचिटणीस पदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

याप्रसंगी देहूचे माजी उपसरपंच रमेश काळोखे, माजी उपसरपंच अभिजीत काळोखे, माजी उपसरपंच सचिन साळुंके, प्रा. विकास कंद, तुकाराम काळोखे, सचिन काळोखे, प्रशांत काळोखे आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. नव्याने नियुक्त केलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीसाठी व पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी दररोज दिवसातील किमान दोन तास तरी दिले पाहिजेत असे मत मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

‘मला मुळातच सामाजिक व विधायक कार्याची आवड आहे. तसेच माझ्या पाठीशी दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य पदाचा अनुभव आहे. पक्षाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये मी योगदान देत आलेलो आहे. आता  सरचिटणीस पदासाठी माझी निवड करून पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पाईक होण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल.  माझ्या देहू पंचक्रोशीतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करेल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी अहोरात्र कार्यरत राहील असा ठाम विश्वास बाळासाहेब काळोखे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.