Talegaon Dabhade News : गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे एमआयडीसीच्या वतीने रोटरीचे माजी अध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या सोमवारी (दि.19) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तळेगावातील इंद्रायणी महाविद्यालयात सोमवारी सकाळी 10 वाजता हे शिबिर होणार आहे. गरवारे ब्लड बॅकेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर होणार आहे. रोटरीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, नुतन अध्यक्ष सुमती निलवे, वरिष्ठ उपाध्यक्ष विन्सेंट सालेर, सचिव प्रविण भोसले, प्रकल्प प्रमुख रूथ सालेर, प्रकल्प सह प्रमुख डॉ. प्रा. संभाजी मलघे उपस्थित राहणार आहेत.

कोरोना महामारीच्या  महासंकटामुळे रुग्णांना रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. रक्ताची गरज भासत आहे. राष्ट्रहित जोपासत सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने जास्तीत जास्त दात्यांनी  रक्तदान  करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.