Vadgaon Maval : बाळासाहेब नेवाळे यांच्या पुणे जिल्हा दूध संघाच्या संचालक पदास मंत्रालयाकडून स्थगिती

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे संघाच्या सलग तीन सभांना गैरहजर राहिल्याने त्यांच्या संचालक पदाबाबत मागील काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. हा वाद पुणे विभागाचे उपनिबंधक, राज्याचे सहनिबंधक यांच्या मार्गे थेट मंत्रालयात पोहोचला आहे. राज्याच्या सहनिबंधकांनी नेवाळे यांचे संचालक पद अबाधित ठेवले असताना त्या आदेशाला मंत्रालयातून स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे बाळासाहेब नेवाळे यांचे संचालक पद पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या संचालक पदाला अखेर मंत्रालयातून स्थगिती मिळाल्याने त्यांचे अबाधित राहिलेले संचालक पद पुन्हा धोक्यात आले आहे.

सलग तीन मासिक सभांना गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ मर्या.कात्रजचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांचे संचालक पद रद्द झाल्याबाबतचा पुणे विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था ( दुग्ध) यांनी आदेश दिला होता. याच्या विरोधात नेवाळे यांनी पुनरीक्षण अर्ज राज्याचे सहनिबंधक  सहकारी संस्था यांच्याकडे केला होता. सहनिबंधक बी एल जाधव यांनी नेवाळे यांचे संचालक पद कायम ठेवत पुणे विभागीय उपनिबंधकांचा आदेश रद्द केला होता. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला होता.

अखेर संचालक पदाला पुन्हा स्थगिती  

या बाबत शरद सहकारी दुध उत्पादक संस्था माळवाडी यांनी सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई यांनी दिलेल्या आदेशा विरुद्ध राज्याचे पशुसंर्वधन, दुग्धव्यवसाय विकास मंत्रालयात पुनरिॅक्षण ( अपिल)  अर्ज दाखल केला होता अवर सचिव शा.वि.दबडे यांनी नेवाळे यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे नेवाळे यांचे जिल्हा दुध संघाचे संचालक पद पुन्हा वादाच्या भोव-यात सापडले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.