Worker beaten : हाटकले म्हणून केळी गोडावूनच्या कामगाराला मारहाण

एमपीसी न्यूज कॅरेटच्या क्षमतेपेक्षा जास्त केळी भरत असताना हटकले म्हणून केळी गोडाऊन मधील कामगाराला लोखंडी सळई ने मारहाण केली आहे.(Worker beaten)हा प्रकार मंगळवारी (दि.11) सकाळी सात वाजता शिरगाव येथे साई मंदिरामागे घडला आहे.

याप्रकरणी वसंत कुमार फडके केवट (वय 19 रा.शिरगाव) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून किशोर भोईटे याच्यावर शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Women harassment : पगाराच्या पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे समीर शेख यांच्या केळीच्या गोडाऊनमध्ये काम करतात.  यावेळी आरोपी हा गोडाऊन मधून केळी त्याच्या गाडीच्या कॅरेटमध्ये भरत होता.तो जास्त केली भरत असल्याचे कळताच फिर्यादी यांनी त्याला विचारणा केली. (Worker beaten)त्याचा राग येवून आरोपीने केळीचे कॅरेट ओढण्याच्या सळईने डोक्यात मारून फिर्यादिला जखमी केले.यावरून गुन्हा दाखल केला असून शिरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.