Pimpri crime : विनाकारण तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज काहीही कारण नसताना तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे.(Pimpri crime) हा प्रकार सोमवारी (दि.10) सायंकाळी सात वाजता पिंपरी येथे घडला.

आतुल लालचंद वैद (वय 19 रा.पिंपरी) यांनी फिर्याद दिली असून किरण डोंगरे व सुमित (पूर्णनाव माहिती नाही) दोघे राहणार मिलींदनगर, पिंपरी यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Worker beaten : हाटकले म्हणून केळी गोडावूनच्या कामगाराला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काहीही कारण नसताना आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. शिवीगाळ का करता म्हणून आरोपीला फिर्यादीने विचारले असता (Pimpri crime) आरोपींनी फिर्यादीला तुला माज आला आहे का म्हणत लोखंडी कोयत्याने डाव्या पायाच्या पोटरीवर मारून जखमी केले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.