Bavdhan : दहा कोटींचे कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवत कंत्राटदाराची 36 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दहा कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याचे (Bavdhan)आमिष दाखवून कंत्राटदाराची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार 15 जुलै ते 12 ऑक्टोबर 2023 या कालावधीत बावधन येथे घडला आहे.

प्रदिप तुकाराम कदम (वय 57 रा.बिबेवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.31) फिर्याद दिली आहे यावरून परेश राव (बावधन) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

NCP : आमदार रोहित पवार यांच्या चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध, पिंपरीत आंदोलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कंत्राटदारा (Bavdhan)असून त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. या कंपनीसाठी 10 कोटी रुपयांचे खासगी कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना कर्ज प्रकरण मंजूर करुन घेण्यासाठी वेळोवेळी पैसे घेत 36 लाख 25 हजार अकाऊंट द्वारे तर 20 हजार रुपये रोख अशी 36 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केली . यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.