Bhosari : कामगारांना शपथ देऊन, वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा.

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीतील डायनोमर्क कंपनीतील कामगारांना 49 व्या सुरक्षा सप्ताह निमित्ताने सुरक्षतेची शपथ देण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले होते. वर्षभर सुरक्षितेचे नियम पाळणाऱ्या कामगारांना, वर्षभर वेळेवर येण्याऱ्या,शिस्तप्रिय कामगारांचा व जे विभाग वर्षभर स्वच्छ आहे. अशा स्वच्छ ठेवणाऱ्या विभागाला पण व्यवस्थापकीय संचालक किशोर राउत यांच्या हस्ते रोख रक्कम, देऊन गौरविण्यात आले.

सुरक्षितेविषयी सुर्यकांत मुळे म्हणाले की “सुरक्षितता हमारी प्राथमिकता नही है। हमारा मुल्य है.सुरक्षीतता विषयी घ्यावयाची काळजी व त्यावरील उपाययोजना याची सविस्तर माहिती  देणाऱ्या कामगारांचा व  ही सन्मान करण्यात आल्याचे मनुष्यबळ विकास प्रमुख सूर्यकांत मुळे यांनी सांगितले.

गुणवंत कामगार आन्ना जोगदंड म्हणाले की आमच्या आस्थापनेत कामगार व व्यवस्थापण यांच्यातील अतुट नाते हे कौटुंबिक स्वरूपाचे निर्माण झाले आहे. आम्हाला पण आम्ही कामगार आहोत याची जाणीव न होता आम्ही सर्वजण डायनोमर्क या आस्थापणेचा  सदस्य आहोत आसे वाटते.

व्यवस्थापकीय संचालक किशोर राउत म्हणाले की आपण सुरक्षित तर आपले सहकारी सुरक्षित पर्याय याने घर सुरक्षित,आमच्या आस्थापणेतील कामगार नाहीत तर ते माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत म्हणूनच आमच्या आस्थापणेची व कामगारांची प्रगती झाली.यावेळी सर्वांनी कोणतेही काम समजल्या शिवाय न करण्याच सल्ला त्यांनी दिला.

यावेळी किशोर राउत,सूर्यकांत मुळे,गुणवंत कामगार आन्ना जोगदंड,विभाग प्रमुख प्रविण बाराथे,मोहनकृन्नन, प्रिया देशमुख,अक्षरा राउत, केतकी, अजितसिग,जयंत राउत,शांताराम पाटील ,सागर बेलेकर, विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.