Bhosari : महिलेच्या नावाने पाहुण्यांना अश्लील पत्र पाठवणा-या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेच्या नावाने तिच्या नातेवाईकांना पोस्टाने पत्र पाठवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2018 ते मे 2019 या कालावधीत दापोडी येथे घडला.

शशांक तांबे (रा. बाणेर) असे अश्लील पत्र पाठवणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशांक यांनी फिर्यादी महिलेचे दीर, त्यांचे व्याही व भाऊ यांना फिर्यादीच्या नावाने पोस्टाद्वारे पत्र पाठवली. या पत्रांमध्ये शशांक याने अश्लील मजकूर लिहिला होता.

हा प्रकार महिलेच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.