Bhosari : रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचा पदग्रहण सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ डायनाॅमिक भोसरीच्या 2023-24 या वर्षीच्या कमिटीचा ( Bhosari) पदग्रहण समारंभ नुकताच चिंचवड येथे पार पडला. या वर्षीचे अध्यक्ष रो. ज्ञानेश्वर विधाटे सचिव रो. दिपक सोनवणे आणि त्यांची‌ कार्यकारिणी यांना रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. मंजु फडके यांनी शपथ दिली. या वेळी प्रमुख पाहुणे बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड आणि असिस्टंट गव्हर्नर रो. मेहुल परमार उपस्थित होते.

रो. मंजू फडके म्हणाल्या, रोटरी क्लब इंटरनॅशनल ही संस्था जगातली सर्वात मोठी समाजसेवी संस्था असून 200 पेक्षा जास्त देशांमध्ये या संस्थेचे काम चालते. या संस्थेच्या वतीने पोलिओ निर्मूलन डायलेसिस सेंटर, पाणी वाचवा-पाणी जिरवा, कूपनलिका पुनर्भरण, विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक अ‍ॅप इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण जगभर काम केले जाते. मागील वर्षी डिस्ट्रिक्ट 3131 यामधील सर्व क्लबच्या वतीने सुमारे 150 कोटी रुपयांचे सामाजिक प्रकल्प राबवण्यात आले.

Chinchwad : पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांची मोठी कारवाई; आठ महिन्यात 53 गुन्हेगार तडीपार

रोटरी क्लब ऑफ डायनाॅमिक भोसरी या शाखेचे सर्व अध्यक्ष व सर्व पदाधिकारी हे उच्चपदस्थ असून या क्लबच्या वतीने फार मोठे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. यापुढेही असेच चांगले काम या क्लबच्या वतीने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हनमंतराव गायकवाड यांनी आपला जीवनपट उलगडला. त्यांच्या टेल्को मधील नोकरी पासून बीव्हीजी ग्रुप पर्यंतचा प्रवास त्यांनी सर्वांसमोर मांडला. त्यांच्या ग्रुपच्या वतीने देशातील दहा कोटी लोकांची जीवनशैली बदलण्याचा संकल्प त्यांनी केला आहे असेही ते म्हणाले.

यावेळी मावळते अध्यक्ष रो. रामदास जैद, संस्थापक अध्यक्ष रो. डॉ. अशोक कुमार पगारिया, नवनिर्वाचित अध्यक्ष रो. ज्ञानेश्वर विधाटे, सचिव रो. दीपक सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. भारतीय जैन संघटनेचा मूल्यवर्धन समितीच्या संचालक दिव्या खिंवसरा आणि दृष्टीहीन सीए भूषण (स्वर भूषण) तोष्णीवाल यांचा सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तर रोटरी क्लबचा पुरस्कार रो. आण्णासाहेब मटाले, रो. विजय गोरडे, रो. सचिन पवार यांना देण्यात आला.

सूत्रसंचालन दीपा दांगट यांनी केले. कार्यक्रमासाठी रो. डॉ. योगेश गाडेकर, रो. संतोष मोरे, रो. रोहित भांबुर्डेकर, रो. संतोष हिंगे, प्रशांत रासकर, रो. केशव काळदाते, विठ्ठल नवाने, पांडुरंग वाळुंज, गणेश काशिद ( Bhosari) यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.