Bhosari : महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अंतर्मुख करणा-या ‘इंद्रायणी थडी’ला सुरुवात; मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अंतर्मुख करायला लावणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव भरविण्यात आला आहे. या महोत्सवाचे उदघाटन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. भोसरी मधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी गावजत्रा मैदानावर हा महोत्सव भरला आहे.

उदघाटन समारंभासाठी आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, सागर गवळी, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

  • महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि शिवांजली सखी मंच पिंपरी-चिंचवड शहर यांच्या इंद्रायणी थडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण संस्कृतीचा शहरांशी साधलेला एक संवाद सोहळा म्हणून ‘इंद्रायणी थडी’ हा महोत्सव सुरु करण्यात आला आहे. शहरी धकाधकीचे जीवन आणि फ्लॅट संस्कृती यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती काहीशी लोप पावत चालली आहे.

भोसरी परिसराची ओळख कला, क्रीडा आणि शेती यांच्याशी निगडित आहे. त्यामुळे हा ग्रामीण संस्कृतीचा बाज राखणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यातूनच हा महोत्सव उदयास आला आहे. इंद्रायणी थडी महोत्सवात महिलांचे पारंपरिक खेळ, बालजत्रा, साहसी खेळ, गावरान खाद्य महोत्सव, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा दर्शविणारे आणि अन्य विविध विषयांवर आधारित विविध स्टॉल लावण्यात आले आहेत. हा महोत्सव आज (शुक्रवार, दि. 8) पासून सोमवार (दि. 11) पर्यंत चालणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.